येरे येरे पावसा
सकाळी उठल्या उठल्या खिडकी उघडून बाहेर डोकावले. आज सूर्य देवाने पडद्याआड रहाणेच पसंत केले होते. काळ्याभोर घनमालांनी दिलासा दिला. ‘होय, तो आज नक्की येणार’. माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. ग्रीष्माच्या भट्टीत होरपळलेली सृष्टीही माझ्यासारखीच अधीर झाली होती. मृगाचे चार दिवस उलटून गेलेत, तरी याच्या येण्याची चाहूल नाही. फक्त जीव गुदमरून टाकणारे वातावरण स्वत:शीच स्पर्धा करीत […]