जगाचा निरोप
काळ येतां वृद्धपणाचा, विरक्तींची येई भावना निरोप घेण्या जगताचा, तयार करीत असे मना वेड्यापरी आकर्षण होते, सर्व जगातील वस्तूंवरी नाशवंत त्या, माहित असूनी, प्रेम करितो जीवन भरी जीवनांतील ढळत्या वेळीं, जेव्हां वळूनी बघतो मागें मृगजळासाठीं धावत होतो, जाणून घेण्या सुखाची अंगे प्रयत्न केले जरी बहूत, हातीं न लागे काहीं पूर्ण कल्पना येई मनीं, जगण्यात आंता तथ्य […]