अमेरिकेतील धार्मिकता – भाग ९
संख्येने तुलनात्मक रित्या कमी असूनही, अमेरिकेच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक जीवनावर फार मोठा प्रभाव टाकणारे म्हणजे ज्यू. तसे ज्यू अमेरिकेत १७ व्या शतकापासून होते. परंतु त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली ती १९ व्या आणि २० व्या शतकातल्या, मध्य आणि पूर्व युरोपातील वंशद्वेषी अत्याचारांमुळे. या अत्याचारांतून सुटका करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ज्यू अमेरिकेकडे धाव घेऊ लागले. आज अमेरिकेतील […]