मिष्किल तारे
चमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे । लक्ष्य वेधूनी घेतां घेतां, फसवित होते आम्हांस सारे ।।१।। कधी जाती चटकन मिटूनी, केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी । खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी ।।२।। एक एक जमती नभांगी, धरणीवरल्या मांडवी अंगीं । संख्या त्यांची वाढतां वाढतां, दिसून येती अनेक रांगांनी ।।३।। हसतो कुणीतरी […]