निसर्गाचे मार्ग वेगळे
मार्ग निसर्गाचे सदा, निश्चित आणि अढळ । चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ ।।१।। चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी । करूया काही आगळे ठरवी विचारांनी ।।२।। आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे । नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे ।।३।। परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती । कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती ।।४।। […]