सुख दु:खाचे चक्र
सतत फिरे चक्र निसर्गाचे सुख दु:खाचे…१, एका मागूनी दुसरा असती पाठोपाठ येती…२, प्रत्येक वस्तूची छाया असते पाठलाग करीते….३, सुखाचे जाता काही क्षण आनंदी समाधानाची होई गर्दी….४ लगेच अनुभव येतो दु:खाचा काळ जाई निराशेचा…५, पुनरपी येता सारे सुख विसरूनी जातो दु:ख….६, जे होत असते ते बऱ्यासाठी म्हणती समाधाना पोटी…७, समाधान शोधणे हेही सुख त्यातच जगती अनेक…८ […]