नवीन लेखन...

दर्शनाची ओढ

पांडूरंगाचे दर्शन घेण्या,  गेला पंढरपूरी  । चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी  ।।   आजपरी शरीर दुबळे साथ देईना  । मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना  ।।   आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी  । भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी  ।।   आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे  । अंगणीत जमले भक्त गण […]

आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ९

सूर्य नसतो म्हणून…….. दिवस आणि रात्र यांचा, म्हणजेच सूर्य असण्याचा आणि नसण्याचा शरीरावर काय परिणाम होतो ते आज बघू. फक्त मीच माझ्या मनानेच ठरवून हे नैसर्गिक उपवास सांगतोय असं नाही हो ! आज ससंदर्भच सांगतो. अष्टांगसंग्रह या ग्रंथात सूत्रस्थान अकराव्या अध्यायातील 63 या श्लोकात दोन शब्द आलेले आहेत. तो श्लोक मुळातून देतो, प्रातराशे तु अजीर्णे अपि, […]

ज्ञान देणारे सर्वच गुरू

अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले, जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले  ।।१।।   निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण, आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून  ।।२।।   उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी, काही ना काही ज्ञान मिळते, वस्तूच्या त्या गुणापरी  ।।३।।   सारे सजीव निर्जीव वस्तू, गुरू सारखे वाटावे, तेच आहेत […]

एक आगळीवेगळी मुलाकात – डास राणी सोबत

दिनांक ५.८.२०१६ रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे. पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही. पण जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर […]

मुंबई महानगरपालिकेची अगम्य नावांची वॉर्ड सिस्टीम

मुंबई महानगरपालिकेची सध्या प्रचलीत असलेली महानगरपालिकेच्या हद्दीतील वॉर्डांना ए, बी, सी ते पुढे एक्स, वाय, झेड अशी इंग्रजी बाराखडीची नांवं देण्याची पद्धत अगम्य आहे.. सर्व कारभार मराठीतून करायचा (म्हणजे तसा ठराव करायचा, प्रत्यक्ष नाही केला तरी चालेल) आणि वॉर्डांची नांवं मात्र इंग्रजी अक्षरांची ठेवायची हा प्रकार माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाला समजण्याच्या पलिकडचा आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या विभागात […]

मक्याच्या कणसाचे औषधी उपयोग

१. मक्याचं कणीस खाल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांना देखील मका खाऊ घाला. २. मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर ते टाकून देऊ नका. मक्याच्या कणसाचे दोन तुकडे करा आणि मधल्या भागाचा नाकाद्वारे सुंगध घ्या. यामुळे सर्दी कमी होते. ३. मक्याचं कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून […]

आॅडी

रस्त्यावर, बस-ट्रेनमधे आपल्याला भेटणारी सर्वसामान्य माणसं आपल्याला त्यांच्या नकळत काय ‘दृष्टी’ देऊन जातात..! अट एकच, आपण त्यांच्याशी बोलायचं किंवा त्यानी बोलायचा प्रयत्न केला तर प्रतिसाद द्यायचा.. काल असाच रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी उभा होतो. चहावाल्याकडे नेहेमीप्रमाणे दोन-चार रिक्शावाले चहा पिण्यासाठी आले होते. त्याच्या रिक्शांच्या पलिकडे एक ‘आॅडी’ पार्क केलेली होती आणि त्या गाडीची किंमत […]

आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ८

दिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे. याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा. अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो. दिवेलागणीची वेळ म्हणजे कातरवेळ. यावेळी जेवू नये असं जुनी माणसं म्हणतात. तेही काही खोटं नाही. अगदी त्या कातरवेळी नाही, त्या आधी जेवलं तरी चालतं. पण […]

‘शब्दनाद’ – बारसं..

अपत्याचं नांव ठेवण्याचा विधी. अपत्य जन्मानंतर जनरली १२ व्या दिवशी हा विधी पार पाडला जातो. आपल्यापैकी बर्‍याच जणांना हा विधी ‘बाराव्या’ दिवशी करतात म्हणून त्याला ‘बारसं’ म्हणतात असे वाटते. मलाही असच वाटायचं पण नंतर शब्दांचा अभ्यास करताना अनेक गोष्टी कळत गेल्या त्यापैकी एक ‘बारसं’ हा शब्द आहे. ‘जे जे आपणांसी ठावे, ते ते जनांसी सांगावे..’ या […]

कोकणी माणसाचं सुपिक डोकं..!!

कोकणातल्या प्रत्येक मुक्कामात काही न काही नविन शिकायला मिळते. काल परवा देवगडात मुक्कामाला होतो. पावसाने थोडी उसंत घेतल्याने सहज भटकायला बाहेर पडलो होतो.हवेत छानसा ओलसर गारवा जाणवत..चहा प्यायचं मन झालं. एका साध्याशा टपरीत शिरलो. काऊंटर वर एक कोकणी वर्णाची मध्यमवयीन बाई बसली होती. चहा सांगितला आणि सहज इकडे-तिकडे बघत बसलो. माझ्या नजरेला त्या टपरीतली एक वेगळी […]

1 9 10 11 12 13 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..