गणपति : विज्ञानयुगीन उकल : गणपतीचे विविध अवतार
पुराणवाङ्मयात गणेशाच्या अवतारांचा उल्लेख आहे. पुराणें वेदांहून खूपच अर्वाचीन आहेत हें खरें. (पुराणाचा काळ आहे, इ.स. च्या पहिल्या सहस्रखातीक पहिली काही शतकें). परंतु, आधी म्हटल्याप्रमाणें, एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, कालप्रवाहात जनसमूहांमधे अनेक प्रकारची माहिती व ज्ञान पिढ्यान् पिढ्या मौखिक स्वरूपात चालत येते, व नंतरच त्याचा लिखित साहित्यात समावेश होतो. त्यामुळे, हें गृहीत […]