नवीन लेखन...

युवकांपुढे एक अनोखा आदर्श

श्रीमंत बापाच्या पोटची वाया गेलेली ‘कारटी’ आपण नेहेमीच बघतो, पण……  ६००० कोटींची उलाढाल आणि अब्जाधीश असणाऱ्या सावजी ढोलाकीया यांनी शिक्षण सुरु असतानाच आणि भविष्यात स्वतःचा उद्योग सांभाळायाची जबाबदारी येऊन पडणार आहे अश्या आपल्या मुलाला पाठवले कोचीनला, खडतर जगाचा अनुभव घ्यायला आणि काबाडकष्ट करून स्वतःच्या हिकमतीवर पैसे कमवून जगायला…. जगभरातल्या ७१ देशांमध्ये कारोबार असणाऱ्या सुरत येथील हरेकृष्णा […]

शास्त्रीय संगीतातील विविध रागांचे गुण-विशेष

खास संगीतप्रेमींसाठी काही महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती. भारतीत शास्त्रीय संगीतात अनेक राग आहेत. आपण जुन्या गोष्टीमध्ये वाचले आहे की तानसेनने राग गाता गाता पाऊस पाडला वगैरे. अशाच प्रकारे प्रत्येक रागाचे काही खास वैशिष्ट्य आहे. ते पुढे बघूया….. १. राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा २. राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा ३. राग देसकार – उत्थान व संतुलन […]

लोथल येथील सिंधु-सरस्वती संस्कृतीची वसाहत व जगातील सर्वात जुना डॉक

लोथलचा काळ आहे इ.स.पूर्व २४०० ते इ.स.पू. १९०० असा. लोथल हे आजच्या गुजरातमधील अहमदाबाद जिल्यामधे धोलका तालुक्यात आहे. ते खंभातच्या आखातापासून जवळ आहे. भारतात आणि जगात आज अनेक मोठमोठी बंदरे आहेत. पण लोथल येथें जगातील सर्वात जुना डॉक (गोदी) आहे, आणि तो आजपासून ४४०० वर्षांपूर्वीचा आहे ! […]

दु:खात सर्व शिकतो

दु:खातची शिकतो सारे, उघडोनी मनाची द्वारे  । दु:खा परी नसे कुणी, जो सांगे अनुभवाने  ।।१।।   दु:ख मनावरी बिंबविते, वस्तुस्थितीची जाणीव देते  । दुसऱ्या परि आस्था देई, जाणीव ठेवूनी कार्य करते  ।।२।।   अधिकाराने माज चढतो, खालच्यांना तुच्छ लेखतो  । जाता हातातूनी अधिकार, माणूसकी काय? हे कळणार  ।।३।।   कष्ट करण्याची वृत्ती येते, सर्वांना समावून घेते  […]

व्योमातुन अवतरला गजमुख

अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १ सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।। व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २ प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी कोटिकोटि मानव-जन्मांच्या […]

गणपति : विज्ञानयुगीन उकल : गजानन-स्वरूपाचें नव-विश्लेषण

गजानन हा गणांचा प्रमुख आहे. गण म्हणजे समूह. पूर्वी भारतात गणराज्यें होती, तेव्हां गण या शब्दाचा ‘समूह’ हाच अर्थ प्रचलित होता. आजही आपण ‘भारतीय गणराज्य’ अशा नामाभिधानात याच अर्थानें हा शब्द वापरतो. आपलें राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ यातही हाच अर्थ अभिप्रेत आहे. तेव्हां, गणाधीश म्हणजेच ‘समूहाचा प्रमुख’. आतां प्रश्न असा उठतो की, हा समूह कुठला ? तर, हा […]

आनंदमय जाग

हलके हलके निशा जाऊनी, उषेचे ते आगमन होई, निद्रेमधल्या गर्भामध्यें, रवि किरणांची चाहूल येई ।।१।।   त्या किरणांचे कर पसरती, नयना वरल्या पाकळ्यावरी, ऊब मिळता मग किरणांची, नयन पुष्पें फुलती सत्वरी ।।२।।   जागविती ते घालवूनी धुंदी, चैत्यन्यमय जीवन करी, जादूचा हा स्पर्श असूनी, न भासे किमया दुजापरी ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com   […]

1 14 15 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..