नवीन लेखन...

देह एक बदलणारे घर

बदलत गेलो घरे मी माझी, आज पावतो कितीक तरी  । पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी  ।।   बालपण हे असेंच गेले, फिरता फिरता गावोगावी  । वडिलांची  नोकरी होती, धंदा करणे माहीत नाही  ।।   पाऊलवाट तीच निवडली, मुलाने देखील जगण्यासाठी  । तीन पिढ्या ह्या चालत राही, एका मागून एकापाठी  ।।   गेले नाहीं आयुष्य सारे, […]

मातृत्वाची कन्येस जाण

आई होऊन कळले मजला, कष्ट आईचे आज खरे  । स्वानुभवे जे जाणूनी घेई, तुलना त्याची कोण करे ।।१।।   नऊमास तू जपला उदरी, क्षणाक्षणाला देऊनी शक्ती  । बाह्य जगातून शोषून सारे, सत्व निवडूनी गर्भा देती ।।२।।   देहावरी आघात पडता, झेलूनी घेई सारे कांहीं  । बाळ जीवाला बसे न धोका, हीच काळजी सदैव राही ।।३।।   […]

यशस्विता : काही पैलू  

यशस्विता ही एखाद्या हिर्‍यासारखी आहे. हिर्‍याला विविध पैलू असतात, व वेगवेगळ्या दिशांनी बघितल्यावर त्याची खरी चमक उमगते, खरी किंमत कळते. यशस्वितेचंही तसंच आहे. भाग – १ : ‘यशस्वी कोण’ असा प्रश्न जर आपल्याला कुणी विचारला तर एखादा खेळाडू, उद्योगपती, कलावंत, ख्यातनाम शास्त्रज्ञ वा समाजात काहीतरी चळवळ उभारू पहाणारा पुढारी, यांच्याकडे आपण बोट दाखवू. पण, यश म्हणजे […]

आहारसार भाग १०

रासायनिक खते आणि विषारी फवारणी केलेला गहू, कोकणात तरी न धुता खाऊ नये. गावठी, देशी गाईच्या दुधाखेरीज अन्य जर्सी हाॅस्टीन एचेफ इ. जनावरांचे सरकारी भेसळ असलेले शिळे दूध पिऊ नये. किड पडून तयार झालेला, अनेक विरंजके वापरून बनवलेला साबुदाणा खाऊ नये. मूलतः भारतीय नसलेले, व्यसन होत जाणारे, पित्तासारखे व्याधी वाढवणारे, देशाचा पैसा देशाबाहेर पाठवणारे चहाकाॅफी सारखे […]

आहारसार भाग ९

अन्नावरचे संस्कार अन्नाचे गुण बदलून टाकतात. मक्याचे दाणे खायचे असतील तर, त्याअगोदर कणीस स्वच्छ तर करायला हवे. त्याच्यावरची आवरणे आणि तूस काढून टाकायला नकोत का ? तस्संच अन्नाचंही आहे. आपल्याला जसं हवंय तसं आपण शुद्ध करून घेतो, वरून खाली पोटात ढकललं की, आपली जबाबदारी संपली. मग शरीराला जसं हवं तसं, शरीर ते शुद्धकरून घेतं. ही सर्व […]

डाग!

कितीही देशी शीतल चांदणेX आनंदाचा ठरुनी मेरुमणी काट्यापरि हा मध्येंच बोचतो डाग तुझा लक्ष्य खेचूनी   ठाऊक नाहीं कधीं कुणाला कसा लागला डाग उरीं पडला असेल चुकून देखील कुणी रंग उधळतां वेड्यापरि   शुभ्रपणाचा मानबिंदू हा डागरहित जीवन त्याचे केवळ एका डागापायीं सत्य झांकाळते कायमचे   मिटून जातां डागही मिटतो उरते मागें सत्य तेवढे परि पुसण्यासाठी […]

आहारसार भाग ८

रासायनिक खतांच्या विषारी अवगुणांपासून आपली सुटका तर नाहीच. ती तर प्रत्येक अन्नामधे, भाज्यांमधे, साखरेमधे, दुधामधे, औषधांमधे, हवेमधे, आणि आता विचारांमधेदेखील आली आहे. गरज आहे ती शुद्धीकरणाची ! अंतर्बाह्य शुद्धीकरण ! अगदी प्रसन्न आत्मा इंद्रीय मनापर्यंत. जेवढे आपापल्या परिने शुद्ध रहाता येईल तेवढे रहायचे. जेवढे शक्य आहे तेवढे सर्व प्रयत्न मनापासून करून अशुद्धी बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न […]

श्रावणमास आणि उपवास

श्रावणात जलधारा बरसत असताना सूर्य नारायण मात्र ढगांच्या आड रुसून बसतो. बाहेर ही अवस्था तर शरीरातील सूर्य नारायण म्हणजेच उदरस्थ पाचकाग्नी ही थोडा मंदच असतो, तो जड पदार्थ पचवण्यास समर्थ नसतो आणि तरीही असा आहार घडलाच तर मात्र अजीर्ण,अतिसार,ताप याला पर्याय नाही. जवळपास सर्वच जण याचा अनुभव घेतात.(म्हणूनच वैद्य वर्गात या महिन्यास सिझन असं म्हणतात. ) […]

पुतनामावशी – एक दंतकथा?

श्रीकृष्णकथेत वर्णन केलेली ही पूतना खरंच कोणी राक्षसी होती की पूतना ग्रहाच्या वर्णनाचा विपर्यास होत ही दंतकथा तयार झाली?! दंतकथा तयार होण्यास फार काळ लागत नसतो. जिथे स्वामी विवेकानंद वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांसंबंधी दंतकथा निर्माण होतात तिथे प्रत्यक्ष भगवंतांचीही काय कथा?! मात्र एका परीने आयुर्वेद हा भारतीय मनात किती रुजला आहे याची ही साक्षच नव्हे का?! […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (१.ब/११)

 ‘आर्य प्रचारकांनी लोकसमूहांतील निवडक व्यक्तींना संस्कृत शिकवलें असणार’ ही मांडणीच बरोबर नाहीं. • वैदिक काळापासून संथा देऊन , योग्य पद्धतीनें वेदपठण शिकवत असत, व त्यासाठी तिथें गुरु-शिष्य परंपरा होती. (तशी संथा घेतली नाहीं तर, उच्चारात कुठे व कसे आघात द्यायचे हें कळणार नाहीं, व अर्थभिन्नता येऊं शकेल, असें म्हणतात ). आजही कांहीं पाठशाला तशी संथा […]

1 2 3 4 5 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..