कृष्णजन्माष्टमीनिमित्त : गोकुळ – (१ ) : कान्हा अवतरला
पुराणिक वर्णन करत आहे : मध्यरात्र तेजानें उजळे, भास्कर झळमळला देवकी-वसुदेवाच्या पोटीं कान्हा अवतरला ।। मध्यरात्रिची घटिका भरली देवकिची काया थरथरली कारागृह-कोठडित अलौकिक-प्रकाश झगमगला ।। हर्षित-अति वसुदेव होतसे लगेच भीती ठाव घेतसे कंसभयानें पिता सुतासाठी मनिं तळमळला ।। क्षणीं उचललें श्यामल बाळा टोपलीत घालून निघाला गळुन शृंखलांच्या खळखळुनी पडल्या जड माळा ।। आपोआप उघडली दारें झोपी […]