८ – प्रिय हा अती श्रीगणपती
प्रिय हा अती श्रीगणपती देव लाडका नाहीं जगीं कोणी गणेशासारखा ।। तुंदिलतनू, सोंडेमधें मोदक धरी तोलीतसे भरलें तबक हातावरी एकवीस हा नैवेद्य प्रिय या गजमुखा ।। मांडीवरी पद ठेवुनी ऐटित बसे तोंडावरी स्मित नेहमी विलसत असे हातीं धरी निज-दंत मोहक मोडका ।। बांधीयलें अपुल्या कटीवर फणिधरा त्या बंधनें सांभाळिलें पीतांबरा जागा दिली पायींच […]