बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद
आज २९ सप्टेंबर. बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद यांची जयंती. मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. मुमताज अली हे मेहमूद यांचे वडील मुंबई टॉकीज स्टुडिओमध्ये काम करत असत. मेहमूद अभिनेता बनण्याच्या आधी ड्रायव्हरचेही कामही करत असत मीना कुमारी यांनी त्यांना टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. तेव्हा त्यांनी मीना कुमारीची बहीण मधू हिच्याशी विवाह केला. विवाह केल्यावर अभिनय करण्यास सुरवात केली. […]