अन्याय
सकाळी अकरा – साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करून यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बिल, पाणी बिल, बाजारहाट, बँकेची कामं वगैरे. आणि ही सगळी कामं सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेन्ट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून […]