खरा एकांत
निसर्गाचा अप्रतिम ठेवा, नदीकाठच्या पर्वत शिखरीं । बाह्य जगाचे वातावरण, धुंदी आणिते मनास भारी ।। त्याच वनी एकटे असतां, परि न लाभे एकांत तुम्हांला । चित्तामध्यें वादळ उठतां, महत्त्व नव्हते बाह्यांगाला ।। खडखडाट सारा होता, दैनंदिनीच्या नित्य जीवनी । समाधानी जर तुम्हीं असतां, शांतता दिसते त्याच मनीं ।। एकांततेची खरी कल्पना, मनावरती अवलंबूनी । अंतर्मन शांत […]