आयुर्वेदातील विविध संज्ञा
आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन- अग्निदीपक – भूक वाढविणारे पदार्थ किंवा औषध. अपथ्य – शरीरास/आरोग्यास अहितकारक अवलेह – साखरेचा गुळाचा पातळ पाक. कफघ्न -वाढलेला कफ कमी करणारे पदार्थ किंवा औषध. काढा – काढ्यातील घटकद्रव्याच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळविणे.नंतर गाळून घेणे. कुपथ्य – शरीरास/आरोग्यास अहितकारक केश्य – केश वाढविण्यास मदत करणारे पदार्थ किंवा औषध. […]