अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ४
अमेरिकेतल्या आमच्या ग्रामीण/निमग्रामीण भागातल्या वास्तव्यात आणि पाळीव/वन्य प्राण्यांच्या सहवासात मला अनेकदा कुमाऊंच्या जीम कॉर्बेटची किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या भानु शिरधनकर, मारूती चितमपल्ली किंवा व्यंकटेश माडगुळकरांच्या वन्यप्राणी जीवनावरील लिखाणाची आठवण यायची. वाटायचं, एखादा शेतकरी अंगणात येऊन सांगू लागेल, “दादानु, डुकरांनी लई वात आणलाय. उसाची लई नासाडी चालवलीय पघा. सांजच्याला बांधावर बसुया बंदुक घेऊन. एखादा डुक्कर मारलात तर पोरं […]