द भायखळा क्लब आणि भायखळा रेल्वे स्थानक
१६६१ सालात मुंबईत आलेल्या ब्रिटिशाना सार्वजनिक जीवनात करमणुकीची सोय नव्हती. त्यांना अशा सोयी करण्याची फुरसतही मिळाली नव्हती. इस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी असल्याने त्यांची व्यापाराची घडी बसवण्याची प्राथमिकता होती आणि करमणूक ही दुय्यम स्थानी होती. ब्रिटीश लोक हे पक्के व्यापारी आणि एकांतप्रिय म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत मात्र समान पातळीवरच्या लोकांनी विचार विनिमय करावा आणि त्यातून व्यापार […]