किचन क्लिनीक – ओवा
ओवा आपण सर्वच जणांच्या परिचयाचा.तसेच भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात ह्याला एक वेगळे आणी महत्त्वाचे स्थान आहे.ओव्याचा वापर हा जेवणामध्ये फोडणीला,भजी बनवताना,ओव्याची कढी,अशा माफक पदार्थांमध्ये हा वापरला जातो.पण खरोखरच ओव्यामुळे त्या पदार्थांना एक वेगळी छान चव त्या पदार्थाला येते.तसेच ब-याच मंडळींना ह्याचे घरगुती औषधी प्रयोग माहीत देखील असणार. ओव्याचे लहान क्षूप असते आणी त्याला लागलेली ही बारीक फळे […]