गोकुळ – ३ : धुंद सुरूं रास
(चाल : पारंपारिक गरबा / डांडियाची ) नृत्य गोपगोपींचें , धुंद सुरूं रास वृंदावन लोटलें शरद-उत्सवास ।। केशकलापीं गोपी माळती फुलें वेण्यांचा संच दाट लांबवर झुले चंपक, जुइ, मोगरा, दरवळे सुवास ।। वस्त्रांतुन एकएक रंग उधळती इंद्रधनू आज जणूं लक्ष उजळती मांडियली रूपयौवनाची आरास ।। गोलगोल नरनारीचक्र हें फिरे झुलत डुलत नृत्य लांबवक्र […]