नवीन लेखन...

झटपट आनंद – तात्पुरत्या सुखासाठी…

“झटपट आनंद – तात्पुरत्या सुखासाठी भविष्यातील होणारा तोटा स्वीकारणे.” एखाद्याला डॉक्टरांनी सांगितले असते कि अंडी मटण एकदम बंद- बाहेरचं खाणं बंद फक्त साधे जेवण वेळच्या वेळी खा. ते पटलेलं असते, परंतु कुठूनतरी मिसळपावचा किंवा चायनीजचा वास येतो किंवा मित्रांच पार्टिचे नियोजन सुरु होतं. मग काय डॉक्टरांनी सांगितलेल हळूच बाजूला पडते नी आपोआपच पार्टीला हजेरी लागते. मग […]

उपकार

उपकार करुन त्याने   मन माझे जिंकिले परि वेळ गेला निघूनी   आभार ना मानले केली नाही परतफेड   उपकाराची मी कामाचे होते वेड   सतत मग्न कामी कामाच्या मार्गांत   चालता पाऊल वाट प्रयत्न करुन कार्यांत   यश साधले अर्धवट खंत वाटली मनां   आठवोनी उपकार पश्चाताप सांगु कुणा   उशीर झाला फार   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com     […]

दातांची काळजी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

दातांचे महत्व – आहारातून उदरात जाणारा अन्नाचा प्रत्येक कण शरीराला पोषण देणारा असतो. अन्न चावल्याने त्यावर सर्वप्रकारच्या पाचक स्रावांचे सुयोग्य संस्कार होऊन शरीराला पोषण मिळते. ह्या प्रक्रियेत सर्वात पहिली जबाबदारी असते दातांची. अर्थात ह्यासाठी दातांचे आणि त्याचबरोबर हिरड्यांचे स्वास्थ्य उत्तम असणे नितांत गरजेचे आहे. “एक घास बत्तीस वेळा चावावा” हा वाक्प्रचार ह्यातूनच रूढ झाला आहे. अन्न […]

सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो. रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्येदेवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत […]

दसरा आणि आपट्याची पाने

दरवर्षी आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून सर्वाना वाटतो. मित्रानो हे लक्ष्यात घेणे जरुरी आहे कि सोने म्हणून ही पाने का वाटावी याचा शास्त्रीय आधार नाही. या मुळे झाडाचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. पाने हि झाडांचा श्वास आहेत, पानातून फोटोसिंथसीसद्वारे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडतात व हवेतील विषारी कार्बन डाय ऑक्साईड झाडात शोषून घेतात. नुकतीच […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १०

परिणाम मांसाहाराचा परिणाम कसा कुठे होत जातो आणि निसर्ग चक्र कसे बिघडते ते पहा. भारतात मांसाहार सुरू झाल्यानंतर पशुधन झपाट्याने कमी होत गेले. कुक्कुटपालन सोडले तर शेळ्या मेंढ्या डुकरे, गाई म्हशी रेडे, यापैकी कोणत्याही प्राण्यांची शास्त्रीय पैदास केली जात नाही. शहरी लोकसंख्या वाढली, दुर्दैवाने मांसाहारी वाढले. पण ही तथाकथित कृत्रिम गरज भागवण्यासाठी लागणारे पशूधन वाढवण्यासाठी मात्र […]

पापाचा हिशोब

वेगाने तो जात असता,  घटना एक घडली  । तुडवले गेले जीव जंतू ,  त्याच्या पाययदळी  ।। ज्ञात नव्हते कांहीं त्याला,  त्याच्या कृत्याचे  । स्वकर्मा मध्ये गुंतले होते,  एक चित्त त्याचे  ।। नजर गेली अवचित त्याची,  एका सरड्यावरती  । दगड मारूनी बळी घेतला,  असूनी अंतरावरी  ।। पापाचा बने भागीदार,  मारूनी सरड्याला  । अकारण  कृत्य जे केले,  पात्र […]

तुमचा डेस्क – तुमची स्टाईल

घर सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे शो-पीस, एंटिक पीसचा वापर करतो. पण ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या कार्यालयामधील वातावरण आनंदी वाटावे असे वाटत नाही का? कारण कार्यालयामधील कामकाजाचा कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम होत असल्याचे ऑफिस कल्चर संबंधित केलेल्या अध्ययनानुसार नुसतेच समोर आले आहे. त्यामुळेच कार्यालयामधील वातावरणात बदल व्हावा, असे वाटत असेल तर आपल्या डेस्कला आवडीनुसार लूक द्या. […]

नवीन येणारी पुस्तके

लवकरंच बाजारात येणारी नवीन पुस्तके. आजच आपली प्रत राखून ठेवा. यातील काही पुस्तके हातोहात खपतील तर काही कदाचित आंदोलकांकडून जाळली जातील… छगन भुजबळ – अनुभव :- “बारामतीच्या करामती” विजय मल्ल्या :- “विश्व कर्जाचे – कर्ज तुमचे सल्ला माझा” शरदचंद्र पवार – व्यक्तिचित्रे :- “मी टिपलेली माणसे” निखील वागळे – नाटक :- “मालकाची जात अजित पवार – […]

यत्न तोची देव जाणावा

१९९२ साली जॉन कोयुम नावाचा १६ वर्षांचा मुलगा युक्रेममधून त्याच्या आई व आजीबरोबर अमेरिकेत कॅलिफोर्नियाधील माऊंटनव्हु या गावी आला तो आपली गरीबी व दारिद्र्य घेऊनच. त्याने ग्रोसरी स्टोअरमध्ये ‘झाडुवाला’ म्हणून काम करायला सुरवात केली तर त्याच्या आईने बेबी सिटर म्हणून काम करायला सुरवात केली. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. त्यामूळे ‘सोशल सपोर्ट प्रोग्रॅम’ च्या आधारे ही फॅमिली कशी […]

1 25 26 27 28 29 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..