देवरुख येथील मातृमंदिरच्या मावशी इंदिराबाई हळबे
आज ८ ऑक्टोबर. देवरुख येथील ‘मातृमंदिरच्या मावशी ऊर्फ मा.इंदिराबाई हळबे यांची पुण्यतिथी. इंदिराबाई हळबे या समाजसेविका होत्या. इंदिराबाई रघुनाथ तथा मावशी हळबे मूळच्या रत्नागिरीतील केळय़े-मजगावच्या, पूर्वाश्रमीच्या चंपावती वासुदेव खेर-कुलकर्णी. प्रचंड गरीबीमुळे अवघ्या ४ इयत्तेपर्यंतचेच शिक्षण झालेल्या मावशींचे वयाच्या १३ वर्षीच लग्न झाले. लग्नानंतरचा काही काळ सुखात जात असतानाच त्यांना दुदैवाने वेढले. लग्नानंतर अवघ्या १० वर्षात त्यांना वैधव्य […]