पिशवीबंद दूध आणि आपले आरोग्य
या विषयावर लिहा अशी सातत्याने विचारणा होत असल्याने मुद्दाम लिहितोय. आपल्या घरी येणारे दूध हे बहुतांशी एखाद्या विशिष्ट ब्रँडचे पिशवीबंद दूध असते. थोडक्यात; होमोजिनाईस्ड आणि पाश्चरायस्ड असे हे दूध असते. यातील पाश्चरायझेशन म्हणजे उच्च तापमानावर दूध तापवणे; जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया मरतील आणि दूध अधिक काळ टिकेल. सध्या याकरता बहुतांशी अल्ट्रा-पाश्चरायझेशन ही पद्धत वापरली जाते. यात २८०° […]