नवीन लेखन...

आहारातील बदल भाग ५६ – चवदार आहार -भाग १८

नेहमीच्या वापरातील मसाल्याच्या तिखट पदार्थांच्या यादीतील एक प्रमुख औषधी घटक म्हणजे मिरी. जिथे मिरची वापरता येणार नाही, अशा ठिकाणी मिरी वापरावी, एवढी तिखट. हिच्या तिखटपणापेक्षा भगभगीतपणा लक्षात रहातो. तोंडाची, जीभेची हायहुय करत, सर्वांना हाऽय् हाऽय् म्हणायला लावणारी, डोळ्यातून पाणी वाहायला भाग पाडणारी ही काळी मिरी आता जगप्रसिद्ध झाली आहे. सूप असो वा सॅलेड, मिरीशिवाय चवच नाही. […]

काही आयुर्वेदिक उपाय काळ्या केसांसाठी

घनदाट काळ्या केसांसाठी केसांच्या मुळांना मिळणारे पोषण हेच काळ्या, दाट आणि लांबसडक केसांचे रहस्य आहे. योग्य आयुर्वेदिक उपायांनी केस केवळ काळेच होतात असे नव्हे, तर त्या केसांवर एक नैसर्गिक चमकही दिसून येते. केस काळे करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. कलर, डाय किंवा शाम्पूने केसांना पोषण मिळत नाही. आयुर्वेदिक जडी-बुटींनी केस धुतल्याने तसेच आयुर्वेदिक तेल […]

वजन कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक टिप्स

आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं “परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात”. आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी […]

आपले आरोग्य व आयुर्वेद

तरुण पिढी आपल्या प्रकृतिस्वास्थ्याविषयी पूर्वीच्या पिढीपेक्षाही चांगलीच सजग झालेली दिसते. विविध वर्तमानपत्रं, मासिकं, पुरवण्यांद्वारे अनेक तज्ज्ञ, व्हॉट्सअप, फेसबुक, या सारखी सोशल मिडीया साधने, डॉक्टर, वैद्य, डाएटिशियन्स लोकांना जागरूक करत असतात. आयुर्वेद या उपचारपद्धतीत मानवी शरीर आणि त्याचा मानसिक स्वास्थ्याशी असलेला दृढ संबंध यांचा विचार करतं आणि प्राथमिकतेने रोग होऊच नयेत यावर भर दिला जातो. त्यातूनही जर […]

राशी व त्यांचे स्वभाव – वृषभ

राशी :- वृषभ स्वामी :- शुक्र देवता :- वासुदेव विश्वरूप जप मंत्र :- ॐ ह्रीं विश्वरूपायनमः उपास्यदेव :- दुर्गा देवी रत्न :- हीरा जन्माक्षर :- ओ औ इ उ ए ऐ वा व वीवि वु वू वे वं ई ऊ वृषभ राशीवर शुक्र (ज्योतिष)ग्रहाची मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशीकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग […]

राशी व त्यांचे स्वभाव – मेष

राशी :- मेष स्वामी :- मंगळ देवता :- भगवान विष्णु जप मंत्र :- ॐ श्रीलक्ष्मीनारायणाय नमः उपास्यदेव :- श्री गणेश रत्न :- पोवळे जन्माक्षर :- चू चे चो ला ली लू लेलो अ आ चै लृ ल लं मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नि तत्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० […]

नांदत्या घराची किंमत ….

दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून दिवाळी मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात . त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले . वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते . 7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण […]

न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!

न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!! आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!! बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!! यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!! मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले? तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!! शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती? तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या? आंबेडकरांच्या मास्तरांना किती […]

नोटांच्या हिंदोळ्यांवर

१५ नोव्हेंबर, २०१६. पुण्याहून सकाळी ६ वाजता निघून सातारा–कोरेगाव– खटाव–वडूज अशी मजल दरमजल करीत चार तासांच्या प्रवासानंतर ‘कलेढोण’ नावाच्या खटाव तालुक्यातील एका छोटयाशा गावात माझ्या ‘स्वयंसिध्द शेतकरी’ या कार्यशाळेसाठी दाखल झालो. प्रवासादरम्यान शेतकऱ्यांना भेटणे व त्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारणे या जुन्या सवयीमुळे सभोवतालच्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना शोधण्यासाठी माझी नजर भिरभिरू लागली आणि नेहमीपेक्षा आजचा […]

1 10 11 12 13 14 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..