गतकर्माची विस्मृती
एके दिनीं निघून जाईन निरोप घेवून ह्या जगताचा प्रवास माझा अनंतात कसा असेल त्या वेळेचा आकाशाच्या छाये खालती विदेही स्थितींत फिरत राहीन ‘तू’ आणि ‘मी’ च्या विरहीत मी गत कर्माचे करिन मापन बाल्यातील चुका उमगल्या तरूणपणाच्या उंबरठ्यावरी सळसळणारे यौवन रक्त वृधावस्तेतील खंत ठरी पूनर्जन्म घेण्याकरितां गर्भाची निवड करीन गत जन्मींच्या चुका टाळूनी आदर्शमय जीवन जगेन […]