वलय
सतत फिरत राही, चक्र जीवनाचे विविधता पाही , रंग आयुष्याचे सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com