भीमसेन जोशींबद्दलचा एक ह्रुद्य किस्सा जरूर वाचा
सच्च्या स्वरांचे, पक्क्या शब्दाचे! मी त्या वेळी वाडिया ब्रदर्स, मुंबई या चित्रपट संस्थेसाठी ‘स्वयंवर झाले सीतेचे’ हे चित्र दिग्दर्शीत करीत होतो. या चित्राचे लेखक गीतकार ग. दि. माडगूळकर होते आणि संगीत वसंत देसाई यांचे. या चित्रपटात रावणाची भूमिका महत्त्वपूर्ण होती. रावण हा ऋषीकुमार सर्व विद्येत पारंगत होता. शस्त्रास्त्र शास्त्रात तो निपुण होता. गायनाचा त्याला शौक होता. […]