निसर्ग स्वभावाचे दर्शन
बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव उमटविती भाव मनावर आमच्या ||१|| चांदण्याची शितलता, मनाची प्रफूल्लता देहाची आल्हादकता लाभली चंद्राचे ठायी ||२|| नाजूक सहवास, मधूर मिळे वास, कोमलतेचा भास जाणविला फूलांनी ||३|| रंगाची विविधता, छटाची आकर्षकता, मनाची वेधता इंद्रधनुष्य देई || ४|| पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता, वेगाची तीव्रता, भासे हरिणाच्या पायी ||५|| प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता, स्वभावाची निर्मलता, […]