नवीन लेखन...

पद्मीनी कोल्हापुरे

अभिनयाबरोबच गाणं गाण्याची आवड असणारी अभिनेत्री म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरे, असं म्हणता येईल. […]

विनोदी अभिनेता शरद तळवलकर

आज १ नोव्हेंबर..  शरद तळवलकर यांची जयंती.  शरद तळवलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१९ झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत […]

आहारातील बदल – चवदार आहार – भाग १

शाकाहारी आहारात जी विविधता आहे, ती मांसाहारामधे नाही. मीठापासून ते अगदी लिंबू, लोणचे, कोशिंबीर, चटणी, सोलकढी, पापड, कुरडया, भजी, वडे, दही, हे सर्व पदार्थ शाकाहाराची शान आहे. आणि भारतीय मांसाहारात वर्ज्य नाहीत. डाव्या बाजुला असणारे हे चटकमटक पदार्थ जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण एखादा मुख्य पदार्थ जर ढेपाळला तर, पूर्ण जेवणाला सांभाळून घ्यायचे महत्वाचे कामही करतात. […]

संगीतकार,संयोजक ,वादक ”अरुण पौडवाल

आज १ नोव्हेंबर.. आज संगीतकार,संयोजक ,वादक ”अरुण पौडवाल यांची पुण्यतिथी प्रो.बी आर.देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी एस.डी.बर्मन ,कल्याणजी आनंदजी ,लक्ष्मीकांत प्यारेलाल ,बाप्पिलाहिरी ,आर.डी.बर्मन यांच्याकडे अॅकॉर्डीयन वादन केले. संगीत संयोजन करताकरता अरुण पौडवाल यांनी १९७१मधे संगीतकार म्हणून आशा भोसले यांच्या आवाजात एक ध्वनिफीत केली.”ओटीत घातली मुलगी विहीणबाई ”गदिमांनी केलेली हि विहीण पारंपारिक होती पण नवेपण […]

डॉ.नरेंद्र दाभोळकर

आज १ नोव्हेंबर.. आज मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची जयंती. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले होते. मा.डॉ.नरेंद्र […]

भाऊबिज..

आज भाऊबिज. भावाला बहिणीने ओवाळायचा दिवस. आपल्या हिन्दू संस्कृतीत प्रत्येक नात्याची पूजा बांधली आहे..बाकी सर्व सोडा पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘धद्या’ची पूजा करून ‘गल्ल्या’चीही कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्म-पंथात असेल म्हणून..तसंच भाऊबिजेचंही..! भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम अधिक गहीरं करणारा हा दिवस मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्म-पंथात असेल म्हणून..सर्वसंपन्न, सामर्थ्यवान पण ज्याला बहिण […]

चिमण्यांनो शिकवा.

चिव् चिव् करित बोलतां   तुम्ही सारी भाषा दोन स्वरातून विचारांना     देत असता दिशा शब्द आमचे सप्तसुरांतून     येती बाहेरी व्यक्त करिती भाव सारे      असती जे अंतरी दोन अक्षरी किमया सारी    तुमच्या भाषेची त्याच चिव चिवे समजुन घेता     धडधड ह्रद्धयाची भाव मनीचे टिपून घेण्या       शब्द लागती थोडे चेहऱ्यावरल्या हलचालीनी      प्रश्न उकलूनी पडे. समज तुमची आपसांतली       कौतूक करणारी शब्द […]

अमेरिकेतील एक – – Dating Center

अमेरिकेतील एक – – Dating Center (डेटींग — मनाची उकल संकल्पना ) अमेरीकेत मुलाकडे सहा महीन्याचा मुक्काम होता. रोज सकाळी मुलगा ऑफिसला जाताना मला जवळच्या वाचनालयांत सोडून देत असे. माझी सून मला तीन तासाने घेण्यासाठी येई. दररोजचा हा कार्याक्रम शिस्तबध्द चालू होता. एक दिवस कादंबरी वाचून संपली. वाचण्याचा कंटाळा आला. आणखी एक तास तेथेच थांबणे गरजेचे […]

भाऊबीज – यमद्वितीया

कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया. हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा […]

1 34 35 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..