नवीन लेखन...

खलनायिका, अभिनेत्री नादिरा

आज ५ डिसेंबर आज खलनायिका, अभिनेत्री नादिरा यांची पुण्यतिथी. जन्म. ५ डिसेंबर १९३२ भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. जन्म बगदादमध्ये. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिरा यांनी एकूण […]

ख्यातनाम गझल गायक गुलाम अली

आज ५ डिसेंबर आज ख्यातनाम गझल गायक गुलाम अली यांचा वाढदिवस जन्म:- ५ डिसेंबर १९४० गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत […]

डॉ. लक्ष्मण देशपांडे

आज ५ डिसेंबर आज वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने जगभर प्रसिद्ध झालेल्या डॉ. लक्ष्मण देशपांडे यांची जयंती. जन्म ५ डिसेंबर १९४३ प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए.,पीएच.डी.,मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक […]

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता

जयललिता उर्फ अम्मा यांचे निधन जयललिता यांची माहिती जन्म. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी तामिळनाडूमधील अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात जयललिता जन्माला आल्या. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मा.जयललिता नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. कोमलावल्ली (मा.जयललितांचे जुने नाव) जयललितांना कधीही चित्रपटात येण्याची इच्छा नव्हती. पण नाइलाजाने त्यांना चित्रपटांत यावे लागले. जयललितांच्या आईची दुसरी बहीण अमबुजावल्ली यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत आणले. सुरुवातीला त्यांनी लहान-लहान ड्रामा […]

बाबासाहेब… फक्त एका समाजाचे

आज इतक्या वर्षांनंतर डाॅ. बाबासाहेब तळागाळात पोहोचले, रुजले. परंतू शेवटी जे सर्वच मोठ्या माणसांचं होतं तेच बाबासाहेब या देव माणसाचंही झालं..बाबासाहेब एक समाजाचे म्हणून ओळखले जायला लागले. जसं, संत नामदेव शिंपी समाजाचे झाले, संत रोहीदास चर्मकार समाजाचे, फुले माळीसमाजाला दिले गेले..! अशी कित्येक उदाहरणं देता येतील. परदेशात असं झालेलं दिसत नाही. मार्टीन ल्युथर किंग किंवा नेल्सन […]

याला जीवन ऐसे नाव भाग ५

गंगोत्री,यमनोत्री हरिद्वारचे पाणी वेगळे, नाशिक सातारा पुण्याचे वेगळे, बार्शी सोलापूर यवतमाळचे वेगळे आणि कोकणाले वेगळे! म्हणजे पचायला कमी जास्त वेळ घेणारे ! केमिकली एचटुओ. पण फिजिकली त्यात एच आणि ओ बरोबर आणखी कितीतरी रसायने पिण्याच्या पाण्यात देखील आढळतात. कोकणातले पाणी तर सर्वात प्रदूषित. वरून येणारी सर्व केमिकल, शिवाय समुद्रातून भरतीच्या वेळी नदीमधे मागे फिरणारे पाणी जमिनीमध्ये […]

बॉलीवूड मधील ट्रेजेडी किंग मुहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पेशावर येथे झाला. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहज़ीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार. पेशावरमधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात […]

याला जीवन ऐसे नाव भाग ४

आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे. बाहेरील उष्णतेमुळे अंगातील पाण्याची पण वाफ होत असते. घाम येत असतो. पाणी कमी होत असते. पाणी कमी झाले तर नाजूक अवयवांना त्रास होतो, म्हणून पाणी भरपूर प्यावे असे आजकाल डाॅक्टरमंडळींकडून सांगितले जाते. बरोबर आहे, काही चूक नाही. पाण्याला जीवनच म्हटले आहे. पण अति तिथे माती हे पण विसरून चालणार […]

संधी

गंगा आली मार्गामध्ये         तहान आपली भागवून घे संधी मिळता जीवनामध्ये     उपयोग त्याचा करून घे ठक ठक करुनी दार ठोठवी      संधी अचानक केव्ह्ना तरी गाफील बघुनि चित्त तुझे        निघून जाईल ती माघारी चालत राही सुवर्ण संधी           हाका देवूनी वाटेवरी बोलविती जे प्रेमाने  तिज       सन्मान तयांचा सदैव करी धुंदी मध्ये राहून आम्ही       चाहूल तिची विसरून जातो जीवनातले अपयश बघुनी       नशिबाला परी दोष देतो यशस्वी ठरती तेच जीवनी      उपयोग करुनी  संधीचा साथ देऊनी प्रयत्न्याची        मार्ग निवडती योग्य दिशेचा डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

चिमुकले जग

किती सोसायचे किती भोगायचे दोन चिमुकल्या हातांसाठी जगायचे बोबड्या बोलातल्या जिव्हाळ्यात झुलायचे, भाबड्या डोळ्यात त्या हास्य फुलवायचे अन् चिमण्या ओठांमधले गीत होऊन गायचे भरारणार्या पंखामधले सामर्थ्य होऊन रहायचे अंधारात मार्ग होऊन ज्योतीपरी तेवायचे जागेपणी उद्याचे स्वप्नगंध हुंगायचे अन् पुन्हा एकदा एकटे एकटेच व्हायचे ना कुणासाठी झुरायचे ना कुणासाठी फुलायचे फक्त ….. चिमण्या पिलासाठीच उरायचे

1 19 20 21 22 23 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..