आई म्हणायची…
आई म्हणायची ‘श्री’ लिहावे नव्या पानावरती, वापरावी नवी वस्तू, कुंकू लावल्या वरती. आई म्हणायची संध्याकाळची, झोपी जातात झाडे, अजून फुलं तोडायला हात होत नाहीत पुढे. आई म्हणायची मिळतेच यश, तुम्ही करत रहा काम, भीती वाटली कि फक्त म्हणावे, राम,राम,राम. आई म्हणायची काहीही असो, होतो सत्याचाच जय, अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय. आई म्हणायची ठेवा श्रद्धा […]