गणपती स्वप्नात माझ्या आला होता
काल रात्री गणपती स्वप्नात माझ्या आला होता सोंडेनेच डोळे पुसत गा-हाणे त्याचे सांगत होता गणेशचतुर्थीचा जणू धसकाच त्याने घेतला अनंतचतुर्दशीची वाट केव्हापासून पाहू लागला संयोजकांना हवी देणगीच्या नावे खंडणी चार आण्याचा गणपती बारा आण्याची मांडणी किडनॅप केल्यासारखे मला तोंड झाकून आणले कसे आणले, कुठे नेले काहीच नाही कळले भजन सेवेसाठी भजनी मंडळ आले ऐकायला ते अन […]