किचन क्लिनीक – वेलची(छोटी)
गोडाचा शिरा म्हणा,खीर म्हणा,मिठाई,मुरांबा, कोणताही गोड पदार्थ घ्या हिचा मनमोहक सुगंध त्या पदार्थाला आला नाहीतर त्या गोडधोड पदार्थाची सगळी मजा आणी लज्जतच निघून जाते बुवा. तर अशी सुंदर नाजूक सुवासिक वेलची अथवा वेल दोडा.विडा,चहा ह्यांना देखील एक वेगळीच रंगत देऊन जाते नाही का? गरम मसाल्यातील हा पदार्थ ह्याचे छोटे क्षुप असते आणी आपण वापरतो ती वेलची […]