नवीन लेखन...

मोक्ष अंतीम फळ

मागील कर्म पुढे चालूनी, कर्माची होई शृखंला, फळ मिळते कर्मावरूनी, मदत होई मुक्तीला ।।१।।   चांगले कार्य करीतेवेळी, मृत्यू येता अवचित, पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां, खेचतो त्याच कार्यात ।।२।।   अपूरे झाले असतां कार्य, ज्ञानेश्वराच्या हातून, पुनरपि येऊनी पूर्ण केले, आठरा वर्षे जगून ।।३।।   ध्रुव जगला पांच वर्षे, अढळ पद मिळवी, कित्येक जन्मीचे तपोबल, पांच […]

घालीन लोटांगण

ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन  घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला ‘त्वमेव माता…’ ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ? या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती […]

नैवेद्य भाग ६

नैवेद्य दाखवण्यापूर्वी पानाच्या खाली पाण्याचे चौकोनी मंडल काढले जाते. पूर्वी जेवणासाठी केळीची पाने अथवा पानाच्या पत्रावळी वापरल्या जात असत. जेवायला सुरवात केल्यावर पान हलू नये, यासाठी कदाचित हे पाण्याचे मंडल असेल. जमिनीवर असलेले सूक्ष्म जीवजंतु ताटाखालून वर येऊ नयेत म्हणून पानाखाली पाण्याचे मंडल. जणु काही मिनी सारवणे आता सारवणे म्हणजे काय असा प्रश्न पुढची पिढी विचारेल. […]

किचन क्लिनिक – लसुण

मसाल्यातला एक खमंग आणि झणझणीत प्रकार. हा हमखास सर्वांच्या जेवणात झणझणीत तडका देण्याकरीता वापरला जातो .हा कंद देखील जमीनीखालीच उगवतो. आयुर्वेदानुसार लसुण ही शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते. ह्यात आंबट सोडुन बाकीचे पाच ही रस अर्थात चवी असतात. आश्चर्य वाटले का? तर स्पष्टीकरण हाजिर हैं! लसणाच्या वरच्या शेंडा तुरट चवीचा असतो, शेंडयाचे टोक खारट असते, […]

नैवेद्य भाग ५

अकाल मृत्युहरणम सर्वव्याधिविनाशनम, विष्णु पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ।। तीर्थ ग्रहण करताना हा मंत्र म्हणतात. मंत्र म्हटलेलं पाणी आणि साधं पाणी यांचं केमिकल अॅनालेसिस कदाचित एकच येईल. पण आपण या एचटुओ मधे श्रद्धा निर्माण केली की, पाण्याचंच तीर्थ बनतं. त्यासाठी आपला विचार भारतीय हवा. देवावर श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास हवा. तसेच अच्युतानंद गोविंद […]

आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल

आज ११ सप्टेंबर..  सुप्रसिद्ध मराठी कवी आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांची जयंती कवी अनिल यांचा जन्म ११ सप्टेंबर  १९०१ रोजी झाला. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी १० चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला. भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कोलकातायेथे प्रयाण केले. त्यांना अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी मिळाली. सनद घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय […]

भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे

आज ११ सप्टेंबर.. थोर गांधीवादी आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे याी जयंती. विनोबाजींचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला. भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्‍या विनोबांची भेट ७ जून १९१६ रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले. त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. […]

कवी अनिल यांच्या २ कविता

जुई पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती   आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला   तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे   कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत शुभ्र […]

संकटांवर मात

जीवन जगताना अनेक अडचणी येत असतात. परंतु अशी कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्या अडचणीतून वाट काढत कसे बाहेर जाता येईल याचा शांतचित्ताने व धीराने विचार केला तर अशा संकटावर सहज मात करता येऊ शकते. या संदर्भात प्रसिद्ध तत्त्ववेत्ते टॉलस्टॉय यांच्यासंबंधी सांगितली जाणारी हकिकत मोठी मनोरंजक आहे. टॉलस्टॉय हे स्वभावाने अतिशय मिश्कील व प्रेमळ […]

…आणि बिरबल परतला

अकबर आणि बिरबल यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अकबर बादशहा असूनही बिरबलची आणि त्याची खूप चांगली मैत्री होती. अनेकदा बिरबलबरोबरच्या सहवासात आपण बादशहा आहोत हे अकबर विसरून जात असे. त्यामुळे दरबारातील अनेक मंडळींना उभयतांची ही मैत्री खटकायची. बिरबलला अकबरपासून कसे दूर करता येईल यासाठी काही जणांचे सारखे प्रयत्न चालू असत. एकदा असेच कोणीतरी बिरबलबद्दल अकबर बादशहाचे […]

1 111 112 113 114 115 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..