पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ डॉ. कमलाबाई सोहोनी
भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ डॉक्टर मा.कमलाबाई सोहोनी (जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ज्ञ) यांची आज पुण्यतिथी त्यांचा जन्म १८ जुलै १९११ रोजी झाला. दुर्गाबाई भागवत आणि कमलाबाई सोहोनी. दोघी सख्या बहिणी. मोठया दुर्गाबाईने साहित्यविश्व व्यापले तर धाकटया कमळाबाईने अवघे विज्ञानविश्व आपलेसे केले. या दोघी बहिणी अहमदनगरला आत्या सीताबाई भागवत यांच्याबरोबर राहून शिकत असताना, पंचक्रोशीतल्या मुली खेळायला त्यांना हाक मारीत ती ‘दुर्गाकमळा’ या जोडनावाने. […]