‘सदरा’ घातलेला ‘सुखी’ माणूस
सुखी माणसाचा सदरा मिळणे म्हणजे परीस मिळण्यासारखंच असतं..सुखी माणसाचा सदरा ही एक सुंदर कल्पना असल्याचे सर्वांनीच मान्य केले असले तरी त्या सदऱ्याचा शोध सुरूच असतो, निरंतर सुरुच राहाणार.. या सदऱ्याची कल्पना बहुतकरून मराठी जनांमधेच आहे की अन्य समाजातही आहे याची मला माहिती नाही परंतू तशी ती नसल्यास सुखासाठी अन्य काहीतरी परिधान करावं असं वाटण्यासारखं त्यांच्यातही असणारच.. […]