नवीन लेखन...

स्वातंत्र्यदिन-गीत – (३) : वाढदिवस स्वातंत्र्याचा ..

वाढदिवस स्वातंत्र्याचा, जो-तो बघ गात आहे – ‘सर्व लोक खूष येथें , सर्व सुशेगात आहे’ ।। पुढे पुढे काळ चाले, पुढे पुढे दुनिया जाई आणि पहा देश अपुला कसा कुठे जात आहे ! कोटि-कोटि देव ठाकत धनवंताच्यासाठी कोण इथें दीनासाठी ? तो पुरा अनाथ आहे ।। महापूर-भूकंपांनी जनजीवन नासे पुरतें फक्त एवढेंच ? बाकी सर्व-सर्व शांत […]

अविवेकी कष्ट

विश्वास होता एक मनी, ते घरटी बांधीत असतांना, कसे सुंदर होईल घरटे,  रंगवित होते कल्पना ।।१।।   खिडकीवरल्या कपारीमध्ये,  शोधला होता एक निवारा, निवाऱ्यात त्या घरटी बांधण्या,  आणीत होते काडीकचरा ।।२।।   उजाडता कुणी खिडकी उघडे,  चिमण्या बांधीत घरटी, सांज समयी बंद झापडे,  ठेवी त्यांना एकटी ।।३।।   नित्य दिनी प्रात: समयी,  कुणीतरी फेकी कचरा समजूनी, […]

रक्षाबंधन व सामाजिक भान

*मी अत्यंत भाग्यशाली आहे की मला अश्या भूमीत जन्म लाभला ज्या भूमीत बहिणींचे, स्त्रियांचे रक्षण** *करण्यास वचनबद्ध होण्यासाठी संपूर्ण एका दिवसाचा उत्सव साजरा केला जातो*.. *स्त्रियांना इतका मान-सन्मान देणारा संपूर्ण विश्वात भारत हाच एकमेव देश आणि हिंदू हाच एकमेव धर्म आहे. अर्थात काही नराधम आपल्या या संस्कृतीला गालबोट लागेल अशी कृत्ये करत असतात. आणि याला कमी […]

खंबीरपणा (उभा विरूध्द आडवा)

कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव!” मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले. मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला. मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन […]

आहाररहस्य ७

काळ म्हणजे ऋतु. वेळ ! ठराविक आजार ठराविक ऋतुमधेच होतात, अमावस्या पौर्णिमेला काही रोगाची जसे, दमा, त्वचाविकार, मानसरोग इ.ची काही लक्षणे वाढतात. याला औषध काय ? काळ हे सर्व प्रश्नांना रामबाण औषध आहे. असे म्हटले जाते. ठराविक गोष्ट घडण्यासाठी काही काळ जाणं आवश्यक असते. बापाची चप्पल मुलाच्या पायात व्हायला सोळा वर्ष जावी लागतात. थोडं विषयांतर होईल […]

मेरू आणि टॅब कॅबला मराठी समजत नाही

मेरू आणि टॅब कॅबला मराठी समजत नाही..मराठीचा निवडणूकीय पुळका येणारे राजकीय पक्ष काय करतायत? मी आता काही वेळापूर्वी ‘मेरू’ आणि ‘टॅब कॅब’ या टॅक्सीं कंपन्यांना अंधेरीवरून दहीसर येथे जाण्यासाठी टॅक्सी हवी म्हणून फोन केला..दोन्ही कंपन्यांनी आम्हाला मराठी समजत नाही आणि म्हणून तुम्ही हिन्दी किंवा इंग्रजीत बोला असा विनंतीवजा आदेश दिला..भयंकर अपमानीत वाटलं मला..मी अशा मुजोर टॅक्सीन् […]

स्वातंत्र्यदिन-गीत – (२) : सुंबरान मांडलं ऽ

स्वातंत्र्याच्या वाढदिवशीं सुंबरान मांडलं ऽ आजपुरतं आनंदाला आवतान धाडलं ऽ ।। रोज-रोज रडन्याचा कट्टाळा आला रं येका दिवसापुरतं दु:ख खोलखोल गाडलं ऽ ।। आयतं मिळालं म्हनुन, किंमत न्हाई रं त्याची ठाऊक हाये कां रं, रगत किती सांडलं ऽ ? धर्माच्या कुर्‍हाडीनं आईचं तुकडं कां ? सांग की रं, कशासाठी भाऊ-भाऊ भांडलं ऽ ? जातपात अन् जमात, […]

स्वातंत्र्यदिन-गीत – (१) : पुढे काय ?

स्वातंत्र्य मिळालें, पुढें काय ? चालेल पुढें हें मढें काय ? स्वातंत्र्यासाठी फुकटच लाखों पडले अम्हि-तुम्हि घेतले धडे काय ? सत्तर वर्षें स्वातंत्र्याला होतिल रे गाजण्यांयोग्य पण घडे काय ? सांडलें रक्त हें खरेंच आहे, परी अविरत त्याचे चौघडे काय ! राज्यावर शिवबांच्या बाजिराव-दुसरा ! मग राज्य बुडालें, अडे काय ? जो खाली, तो तर खाली-खाली […]

आहाररहस्य ६

आहाराचा विचार कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे आपण पहात होतो. या सूत्रातील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, सात्म्यता. म्हणजे बाकी दुनिया गयी भाड मे, मला काय पचणारे आणि माझ्यासाठी अमुक पदार्थ चालण्णार आहे की नाही. हे ठरवणे. एखाद्याला पंधरा दिवस सलग पुरणपोळ्या खाल्या तरी पचतात, एखाद्याला पन्नास जिलब्या पण पचतात. पण तोच नियम सर्वांना लागू होईल […]

‘शब्दनाद’ – पगार, वेतन, Salary..

सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द. अगदी ठार अडाण्यालाही या शब्दाचा अर्थ पटकन समजतो. महिन्याचे १ ते १० असे दहा दिवस पगाराचे असतात. मी जी माहिती आपल्याला देणार आहे ती आपल्यास नसल्याने आपले काहीच बिघडणार नाही मात्र माहित असल्याने ‘पगार’ घेताना (पगार नाही) मजा मात्र दुप्पट वाढेल..! मित्रांनो हा कोणत्याही भाषिकाला अगदी आपला वाटणारा शब्द मुळात ‘पोर्तुगीज़’ आहे हे […]

1 124 125 126 127 128 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..