तुझी आठवण जागी : ( स्मृतिकाव्य )
तूं गेलिस, मी उरलो मागे सखा तुझा अनुरागी जोवर मी, तोंवर राहीलच तुझी आठवण जागी ।। रात्र पसरतां, भवतालीं निद्रिस्त सर्व दुनिया मीच फक्त असतो जागा अन् तुझी आठवण जागी ।। चुकुनी आली झोप कधी मज, तरि मी निजूं कसा ? ठेवायची असे दिनरातीं तुझी आठवण जागी।। भाग्य झोपलें माझें, कायमचीच झोपलिस तूं मी कायम झोपेतों, […]