गांव, मौजे, खुर्द, बुद्रुक इत्यादी इत्यादी..
‘गांव’ या शब्दाचा जन्म कसा झाला, त्याचा अर्थ काय या प्रश्न मला सतावत होते. शब्दांचा मागोवा घेणे ही माझी खोड आहे आणि त्यानुसार मी या शब्दांचा माग काढत गेलो आणि मोठी विलक्षण माहिती माझ्या हाती आली.. मित्रांनो, ‘गांव’ हा शब्द चक्क ‘गाय’ म्हणजे ‘गो’ या शब्दातून जन्मला आहे. नाही ना विश्वास बसत? आता हा कसा जन्मला? […]