तल्लीनतेत आहे ईश्वर
श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा, यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ।।१।। तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर, तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ।।२।। बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी, एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ।।३।। मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी, डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ।।४।। टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी […]