आत्म्याचे बोल
काय आणि कसे बोलतो, त्यांना माहीत नव्हते, सहजपणे सुचणारे, संभाषण ते असते ।।१।। शिक्षण नव्हते कांहीं, अभ्यासाचा तो अभाव, परि मौलिक शब्दांनी, दुजावरी पडे प्रभाव ।।२।। जे कांहीं वदती थोडे, अनुभवी सारे वाटे, या आत्म्याच्या बोलामध्ये, ईश्वरी सत्य उमटे ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com