नवीन लेखन...

नाभी केंद्रांत आत्मा

आत्मा कोठे असतो, नाभी केंद्रात शोधाल का ? तो तर दिसत नसतो, मग त्यास जाणाल का ?….१, सर्व इंद्रिये वापरली, परि न झाला बोध, कोठे लपला आहे, न लागे कुणा शोध….२, विचार आणि भावना, संबंध त्याचा ज्ञानाशी मेंदूत आहे इंद्रिय, संपर्क त्यांचा सर्वांशी….३, मेंदूवरी ताबा असे, नाभीतील मध्य बिंदूचा समजून घ्या सारे, तेथेच आत्मा देहाचा…४, मातेचे […]

देवगडातल्या ‘गिर्ये’ गांवचं ‘श्री देव रामेश्वर मंदिर’

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील ‘गिर्ये’ हे एक दक्षिण कोकणातील कोणत्याही गावाप्रमाणे एक निसर्गसंपन्न गाव. सुप्रसिद्ध ‘विजयदुर्ग’ किल्ला याच ‘गिर्ये’ गावात वसला आहे व त्याचे आदिलशाही अम्मलातले नाव ‘घेरिया’ हा ‘गिर्ये’चाच अपभ्रंश आहे ( ‘गिर्ये’च घेरिया झालं की ‘घेरिया’चं गिर्ये यात नेहेमीप्रमाणे तज्ञांत मतभेद आहेत. आपला तो विषय नाही.). आता इतक्या वर्षानंतर ‘विजयदुर्ग’ हे वेगळे महसुली गाव […]

‘गीत गोविंद’ची श्रेष्ठता

ओरिसातील जगन्नाथपुरी येथील जगन्नाथाचे ( भगवान श्रीकृष्णाचे) मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तेथेच घडलेली ही एक प्राचीन कथा आहे. त्या नगरीत जयदेव नावाचा हरिभक्त राहत होता. श्रीकृष्णावरील भक्तीपोटी त्याने ‘गीत गोविंद’ हा ग्रंथ लिहिला. तो खूपच लोकप्रिय झाला. अतिशय प्रासादिक व मधुर रचना असलेला हा ग्रंथ घराघरात पोहोचला होता. त्या नगरीचा राजाही कृष्णभक्त होता. त्यानेही असाच एक […]

स्वप्न आणि सत्य

स्वप्न आणि सत्य यांच्यात एकच ‘श्रेष्ठ कोण?’ यावरून भांडण सुरू झाले. ‘स्वप्न’ म्हणाले, मीच श्रेष्ठ. कारण कोणताही माणूस आधी स्वप्ने पाहातो आणि नंतर ते सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यावर ‘ सत्य’ म्हणाले, अनेकवेळा सत्य हे कल्पनेपेक्षाही ( म्हणजेच स्वनापेक्षाही) अतिशय वास्तववादी असते. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. दोघांचे भांडण विकोपाला गेले. […]

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग ६

केवळ मराठीचा विचार करायचा झाला तर आपल्या तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वर – नामदेवांचे अभंग, जनाबाईंच्या ओव्या, भीमसेन जोशी, आशा भोसले, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ऐकणे म्हणजे भक्ती रसात पूर्णपणे बुडून जाणे. पण हे भक्ती संगीत जेव्हा खर्‍या अर्थाने लोकसंगीत होतं तेव्हा त्याचा जनमानसावरचा प्रभाव समजून येतो. मग ते गावातल्या देवळातले कीर्तन असो, दमल्या भागल्या कष्टकर्‍यांचा संध्याकाळचा भजनाचा […]

प्रयत्नांती परमेश्वर

बर्‍याच वर्षांपूर्वी इटलीतील एका शहरातील एका शाळेत घडलेली ही एक घटना. वर्गात एक शिक्षक अतिशय तन्मयतेने शिकवित होते. त्याचवेळी वर्गाच्या खिडकीच्या बाहेर एक मुलगा उभा राहून ते काय शिकवितात हे लक्ष देऊन ऐकत होता. त्या मुलाचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले होते, पायात चप्पलही नव्हती. हा मुलगा खिडकीपाशी उभा राहिल्याने वर्गातील मुलांचे लक्ष सारखे त्याच्याकडे जात होते. त्या […]

नोबेल पारितोषिकाचे जनक आल्फ्रेड नोबेल

जगातील सर्वात प्रतिष्ठेचे मानले गेलेले नोबेल पारितोषिक स्विडीश शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाते. आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म १३ ऑक्टोबर १८३३ रोजी स्टॉकहोम येथे झाला. त्यांचा मृत्यू १० डिसेंबर १८८६ रोजी झाला. आल्फ्रेड नोबेल यांनी सैन्याच्या कामासाठी डायनामाईटचा शोध लावला. युद्धाबरोबरच खाणी, रस्ते तयार करण्याच्या कामातही त्याचा वापर होऊ लागला. नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते […]

मणिपूर – हिंसाचाराने सर्वात ग्रस्त ईशान्येकडील राज्य

अफस्पा काढण्याआधी लष्कर मागे घेणे जरुरी अस्थिर भागात लष्कराने अतिबळाचा वापर करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, यावर निव्रुत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिकुल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमध्ये मागील 20 वर्षांत अनेक  बनावट चकमकीची प्रकरणे घडली असून, त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. संरक्षण व पोलिस दलांनी अतिबळाचा वापर लष्करी विशेषाधिकार […]

1 139 140 141 142 143 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..