नवीन लेखन...

माझ्या भारतात ना…

असा आहे ना … माझा … भारत महान, माझा भारत महान … १ माझ्या भारतात ना …. (काही अपवाद वगळता) लायक व्यक्ती निवडून येतात … २ माझ्या भारतात ना …. लायक माणसं नेते बनतात … ३ माझ्या भारतात ना …. लायक लोक, शिक्षण नसतांना मंत्री बनतात …४ माझ्या भारतात ना …. लायक लोकांना लठ्ठ पगाराच्या नोकर्‍या […]

कोण कोणाचे गुरु?

अखेर ते दुकान बंद पडलं आणि त्याचं शटर नेहमीकरिता खाली ओढण्यात आलं. एका मराठी माणसाने ऐपतीबाहेर खर्च करून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं म्हणून अगदी मोजक्या लोकांना किंचित कौतुक वाटलं, तर स्वत: काहीही न करता इतरांचे व्यवसाय कसे व कधी बंद पडतील याची रात्रंदिवस काळजी वाहणाऱ्या बहुसंख्य रिकामटेकड्यांना ते दुकान लवकरच बंद पडणार, याबद्दल उद्घाटनाच्या […]

यालाच म्हणतात भविष्याचा वेध

इस्त्रायलची जगण्याची लढाई……. नाही तर हा ज्यू/यहुदी समाज कधीच इतिहास जमा झाला असता….जसा हिन्दूचा ह्रास होत आहे एक वेळ जगात 32 देशात हिन्दू राज्य होते व धर्म लोकसंख्या जगात सर्वात जास्त होती आज काय व कुठे आहे……….. फ्रान्स वर लागोपाठ हल्ले झाले,पण फ्रान्स वर गन आणि ट्रकनेच हल्ला होतोय अणुबॉंबने नाही याबद्दल त्यांनी इजरायलचे आभार मानले […]

पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी

१२ वर्षाखालील सर्व मुलांच्या पालकांनी नोंद घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. राष्ट्रीय रोगप्रतिबंधक लसटोचणी स्मरण मोहीम ही नि:शुल्क सेवा आहे. तुम्ही फक्त एवढेच करा. तुमच्या बाळाचं नाव आणि जन्मतारखेचा एसएमएस संदेश 566778 या क्रमांकावर खालील सूत्रात पाठवा :- Immunize[स्पेस]बाळाचे नाव[स्पेस]बाळाची जन्मतारीख (हे सगळं इंग्रजी त हवं) उदा. […]

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा

आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो….. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात….. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे….. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे….. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे….. एवढेच नव्हे तर […]

शिवकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध

शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचा जवळपास २५ देशांशी व्यापारी संबंध आलेला दिसतो. ते पंचवीस व्यापारी व त्यांचे देश पुढील प्रमाणे १) फिरंगी- क्रिस्त- किरिस्ताव- पोर्तुगीज- पोर्तुगाल २) इंगरेज- इंग्रज -इंग्लंड ३) वलंदेज- डच- हॉलंड ४) फरांसिस- फ्रेंच- फ्रांस ५) दिनमार्क- डिंगमार- दीडमार- डेन्मार्क ६) निविशयान- नॉर्वेजिअन- नॉर्वे ७) ग्रेग- यवन-ग्रीक ८) लतियान- लॉटीअन- तलियना- इटालियन ९) यहुदीन- […]

मोबाईलवरुन खरेदी….

आज काल घर बसल्या मोबाईलवरनं हवं ते बुक करून मागवू शकतो. मी चितळे मिठाईला फोन लावला ट्रींग ट्रींग. चितळे मिठाई आपले स्वागत करत आहे. बोला काय हवंय? काही तरी गोड मागवावं म्हणतो. लाडू साठी एक दाबा , रसगुल्ला साठी दोन दाबा , गुलाबजामुन साठी तीन दाबा. मी म्हणालो लाडू हवेत. बूंदीच्या लाडू साठी एक दाबा , […]

मानसिक डाएट

ही कन्सेप्ट जरा नविन आहे, पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे. म्हणजे बघाना…. आपलं वजन वाढतं, आयुष्याच्या फिगरवर परिणाम होतो, बीपीच्या गोळ्या सुरु होतात, शुगर डिटेक्ट होते, किंवा कधी कधी स्वत:ची आगाऊ काळजी म्हणुन सुद्धा किंवा कधी कधी तर चक्क फॅशन म्हणुन आपण डाएट करायचा प्रयत्न करतो. हे सगळ करतं असताना आपण आपल्या मानसिक […]

पार्ले-जी – सगळ्यांच्या आवडीचे एकमेव बिस्किट.

लहान-मोठ्यांच्या सगळ्यांच्या आवडीचे एकमेव बिस्किट. पार्ले-जी या बिस्किटाने रेकॉर्ड घडवलाय. गेली कित्येक वर्षे त्याची चव लाखोंच्या जीभेवर रेंगाळते आहे.

1 140 141 142 143 144 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..