व्यक्ती, समाज – २ : बाजी प्रभू देशपांडे व पावनखिंड : कांहीं चर्चा
• शिवरायांच्या पन्हाळगड ते विशाळगड अशा दौडीच्या संदर्भातील मानाचें पान आहे, बाजी प्रभू देशपांडे यांचा घोडखिंड ऊर्फ पावनखिंड येथील पराक्रम. जरी ती घटना सर्वांना माहीत असली, तरी, आपण आधी ती थोडक्यात पाहूं या ; नंतर त्या अनुषांनानें तिच्यावरच्या एका साहित्यकृतीवर कांहीं चर्चा करतां येईल. • सिद्दी जौहरनें पन्हाळगडाला घट्ट वेढा घातला, आणि तो पावसाळ्यातही तसाच चालूं […]