नवीन लेखन...

पंढरीचा राणा – ४ : चला रे जाऊं पंढरिला

ज्ञानदेव : चला रे जाऊं पंढरिला तिथें कधीचा अपुल्याकरितां श्रीहरि खोळंबला ।। ज्ञाना ज़रि हठयोगी आहे परी हृदय श्रीहरीस पाहे योगेश्वर आनंदसिंधु तो, हें ठावें मज़ला ।। कुणी तया म्हणती श्रीरंग कुणि विठ्ठल, कुणि पांडूरंग स्वयम् द्वारकानाथ आपुल्या पंढरीस आला ।। मुगुट विराजे तोच शिरावर मंद-हास्यही तेंच मुखावर तीच रुळे वक्षावर मोहक वैजयंतिमाला ।। पुंडलिकाचें निमित्त […]

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग १

भारतात असताना, शाळा कॉलेजच्या लॅब्जमधे गाणी ऐकण्यासाठी रेडिओ, टेपरेकॉर्डर वगैरे गोष्टी स्वप्नात देखील येणं शक्य नव्हतं. पुढे NDDB च्या गुजराथमधील फार्मवर, गायींमधे भृणप्रत्यारोपण (Embryo Transfer) च्या लॅबमधे काम करताना आम्ही “साब” झालो होतो. त्यामुळे सायबासारखं वागणं भाग होतं. “साब” लोक बिहारपासून राजस्थानपर्यंत आणि पंजाबपासून केरळापर्यंत वेगवेगळ्या राज्यातले होते. त्यामुळे गाण्याची आवड निवड जुळणं अवघड होतं. नवरात्रीच्या […]

सुख दु:खाचे चक्र

सतत फिरे चक्र निसर्गाचे सुख दु:खाचे…१, एका मागूनी दुसरा असती पाठोपाठ येती…२, प्रत्येक वस्तूची छाया असते पाठलाग करीते….३, सुखाचे जाता काही क्षण आनंदी समाधानाची होई गर्दी….४ लगेच अनुभव येतो दु:खाचा काळ जाई निराशेचा…५, पुनरपी येता सारे सुख विसरूनी जातो दु:ख….६, जे होत असते ते बऱ्यासाठी म्हणती समाधाना पोटी…७, समाधान शोधणे हेही सुख त्यातच  जगती अनेक…८   […]

३३ कोटी देवांचे कोडे

खूपशी हिंदुद्रोही मंडळी वाद घालताना एक प्रश्न हमखास विचारतात, कि “तुमच्या त्या फडतूस हिंदू धर्मात म्हणे ३३ कोटी देव आहेत, त्यांची नावे तरी माहिती आहेत का तुम्हाला?” आणि आमचे भोळे-भाबडे हिंदू बंधू या प्रश्नासमोर गडबडून जातात. मलाही व्याख्यानाच्या वगैरे निमित्ताने जेव्हा इतर मंडळी भेटतात, तेव्हा हा प्रश्न विचारणे ठरलेले असते. कधी खोडसाळपणे, तर कधी जिज्ञासेने! तेव्हा […]

हा दुरावा साहवेना (स्मृतिकाव्य)

हा दुरावा साहवेना, संपवी क्षणभर स्वयें एकदा स्वप्नांत तरि ये, एकदा तरि ज़वळ ये ।। कां अशी गेलीस सखये प्रेमबंधन तोडुनी ? कां अशी गेलीस सखये एकला मज सोडुनी ? सात-जन्मीं-साथिचें तें वचन मजला आठवे ।। काय झालें सांग, मजवर एकदम रुसलिस अशी काय आलें सांग, जगतां त्यागुनी गेलिस कशी ? जन्मभरचे पाश तुटणें , चांगलें […]

पंढरीचा राणा – ३ : निघे दिंडी पंढरपुरला

भेटायाला भीमातीरीं उभ्या विठ्ठलाला निघे दिंडी पंढरपुरला ।। ज्ञानदेव, मुक्ता, निवृत्ती नामदेव, सोपान संगती सवें तयांच्या, जनी सावता अन् चोखामेळा ।। भान हरपुनी वारी नाचे नाम मुखीं पांडूरंगाचें टाळमृदुंगांसंगें वाजत एकतारि-चिपळ्या ।। नेत्रांपुढती रूप मनोहर उभें कटीवर ठेवुनिया कर गळ्यात खुलते हंलती-डुलती तुलसीची माला ।। जीवन झालें पांडुरंगमय नुरलें माया-मोह नि भव-भय भक्तीतुन मुक्तीप्राप्तीचा पथ हा […]

भारतीय नौदलाचा अभिमान – आयएनएस विक्रांत

पाकिस्तानविरुद्धच्या १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी मॅजेस्टिक श्रेणीची ब्रिटीश बनावटीची विमानवाहक युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ म्हणजे भारतीय नौदलाच्या अभिमानाचा विषय. आयएनएस विक्रांत (आर ११) (पूर्वीचे एच.एम.एस. हर्क्युलिस (आर ४९)) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. २२ सप्टेंबर १९४५ रोजी त्याचे जलावतरण करण्यात आले. जानेवारी १९५७ च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. ४ […]

साहित्य संमेलनातील योगायोग

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात डोकावले तर अनेक मजेशीर गोष्टी लक्षात येतात. या संमेलनाच्या आयोजनातून अनेक योगायोगही जन्माला येत असतात. अशाच काही योगायोगांचा आढावा. पहिली पाच संमेलने ग्रंथकार संमेलने या नावाने भरली. या संमेलनांना स्वागताध्यक्ष नव्हता. १९०८ च्या पुणे संमेलनाला प्रथमच स्वागताध्यक्ष लाभले आणि ते होते वा.गो.आपटे. न्यायमूर्ती म.गो.रानडे १८७८ मध्ये पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाचे […]

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करावी लागणे हे भारतीयांचे दुर्दैव

स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहीले. मात्र खरे म्हणजे सावरकर जरी हिंदुत्त्ववादी होते तरीही त्यांनी इतर धर्मांचा नेहमीच आदर राखला. आजच्या तथाकथित बाजारबुणग्या सेक्युलरवाद्यांसारखे नव्हते. आजचे सेक्युलरवादी म्हणजे केवळ हिंदूविरोधी असतात. आपल्या देशात ज्यांना हिंदूंनी निवडून दिले ते स्वत:ला हिंदू म्हणायला तयार नाहीत. दिवंगत राजीव […]

सर्वांची काळजी

मुसळधार वर्षा चालली, एक सप्ताह  होऊन गेला, पडझड दिसली चोहीकडे, भरुन वाहे नदी-नाला ।।१।।   काय प्रयोजन अतिवृष्टीचे ? हानीच दिसली ज्यांत खरी, निसर्गाच्या लहरीपणानें, चिंतीत झाली अनेक बिचारी ।।२।।   दूरदृष्टी माझी मर्यादेतच, विचार तिजला अल्प घटकांचा, विश्वचालक काळजी करि, साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

1 146 147 148 149 150 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..