मुखवटे (गझल)
भोवती बघतो तिथें दिसतात सारे मुखवटे होय रे, मंचावरी असतात सारे मुखवटे ! बदलतो माणूस वस्त्रें, बदलतो आत्मा कुडी बदलती नेते तसे त्यांच्या मनाचे मुखवटे ।। रौद्र वादळ वा पुराचें चाललें थैमान जे थंड काचेतून बघती थंड उडते मुखवटे ।। रोज जे घेती सुपार्या, निजशिशुस नवनीत ते ओळखा, कुठले खरे ते, आणि कुठले मुखवटे ।। भामट्यांचा […]