नवीन लेखन...

लाल दिव्याची गाडी !

कुठले हमीभाव आणि कोणतं आरक्षण, आम्ही करत असतो फक्त स्वार्थाचं रक्षण. मूर्ख आंदोलकांचं नेतेपद स्वीकारायचं आणि मंत्रिपद मिळताच आंदोलनांना शवागारात रवाना करायचं. नेतेगिरी करण्याची आमची हीच पध्दत आहे, एक लाल दिव्याची गाडी, बाकी सब कुछ झूठ है ! श्रीकांत पोहनकर — 98226 98100 shrikantpohankar@gmail.com.

भरताची निराशा

निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल…….।।धृ।। लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल  ।। झाली होती पितृज्ञा ती  । पाठवी रामा वनीं  ।। माता कैकेयीच हट्ट करिते  । दूजे नव्हते कुणी  ।। कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल….१, निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल  ।।   उंचबळूनी हृदय भरता  । कंठी दाटला सारे  […]

जीवन प्रभूमय

जीवन काय आहे, मला जे वाटत असे, ते समजून घ्या तुम्हीं, प्रभूमय ते कसे ।।१।। मृत्यूचा तो विचार, कधी न येई मनी, मृत्यू आहे निश्चित, माहित हे असूनी ।।२।। भीती आम्हां देहाची, कारण ते नाशवंत, न वाटे मरूत आम्ही, आत्मा असूनी भगवंत ।।३।। आत्मा आहेची अमर, मरणाची नसे भीती, जी भीती वाटते, ती असते देहाची ।।४।। […]

भारतातील दहशतवादी हल्ले आणि सौदी अरेबियातून मदत

सौदी अरेबियातून पकडून आणण्यात आलेल्या झबीउद्दिन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याच्या कारवायांबाबत प्रसारमाध्यमं भरभरून माहिती देत आहेत. वृत्तवाहिन्यांवर चर्चेची गुर्‍हाळं चालू आहेत. हा सगळा तपशील तपासयंत्रणाच पुरवत आहेत, हे उघड आहे. असा हा तपशील प्रसिद्ध झाल्यानं, आपण किती मोठं घबाड पकडून आणलं आहे, असा दावा भारताच्या गुप्तहेर संघटना करतात व  तसं ठसविण्यासाठीही असा तपशील प्रसारमाध्यमांना पुरवला […]

हर घडी मिळो सहवास

मानव देह देऊनी ईश्वरा, उपकार केले मजवरती, सेवा करण्या तव चरणाची, संधी लाभली भाग्याने ती ।।१।। कर्म दिले मानव योनीसी, श्रेष्ठत्व येई  त्याचमुळे, उद्धरून हे जीवन नेण्या, कामी येतील प्रयत्न सगळे ।।२।। मुक्त होणे जन्म मरणातूनी, साध्य होई प्रभूसेवेने, परि तीच मुक्ती वंचित करते, आनंदमयी प्रभू दर्शने ।।३।। एक मागणे प्रभू चरणी, मुक्ती न देई मजला, […]

देहातील शक्ती

नाकासमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा  । थंड हवा आत जाते,  गरम होवून बाहेर येते  ।।१।। अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून  । भात्यापरि फुगते छाती,  हवा आत खेचूनी घेती  ।।२।। आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते  । भावना जेव्हां जागृत होती,  रोमरोमी पुलकित होते  ।।३।। अवयवे सारी स्फूरुनी जाती,  देहामधूनी विज […]

भूतदया

एका थोर विचारवंताचे पुस्तक वाचत होतो.  दया  ह्या गुणधर्मावर त्यांचे भाष्य मनाचा ठाव घेणारे होते. सर्व प्राणीमात्र जीवजंतू झाडे झुडपे वृक्षलता इत्यादी. ज्यांच्यामध्ये जीवंतपणाचे लक्षण असते त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये दयाभाव खोलवर रुजला असतो. ह्य़ाच भावनेमधून प्रेम जिव्हाळा सख्य ह्यांचे अंकूरण होत असते. समाधान तेथेच मिळते. अचानक एक प्रसंग डोळ्यासमोर आला. गावाकडे जात असतांना, आमची गाडी नादुरुस्त […]

महाराष्ट्र सदनातले ‘ते’ झाड

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती. त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे […]

जगाचा निरोप

काळ येतां वृद्धपणाचा, विरक्तींची येई भावना निरोप घेण्या जगताचा, तयार करीत असे मना वेड्यापरी आकर्षण होते, सर्व जगातील वस्तूंवरी नाशवंत त्या, माहित असूनी, प्रेम करितो जीवन भरी जीवनांतील ढळत्या वेळीं, जेव्हां वळूनी बघतो मागें मृगजळासाठीं धावत होतो, जाणून घेण्या सुखाची अंगे प्रयत्न केले जरी बहूत, हातीं न लागे काहीं पूर्ण कल्पना येई मनीं, जगण्यात आंता तथ्य […]

प्राचीन भारतीय जलव्यवस्थापन

पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणं आपल्याला इंग्रजांचे शासन येण्याच्या आधीपर्यंत ठिकठिकाणी दिसतात. अगदी उत्तर पेशवाईत औरंगाबाद ला बांधलेले ‘थत्ते नहर’ असो, की पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणी पुरवठ्याची रचना असो. बऱ्हाणपूर ला आजही अस्तित्वात असलेली, पाचशे वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना असो की पंढरपूर – अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहन कालीन बांधलेली बारव असो. ‘समरांगण सूत्रधार’ ह्या […]

1 153 154 155 156 157 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..