माझा गुन्हा एकच होता !
मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील उदगीरला आयोजित करण्यात आलेली ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही कार्यशाळा सुरु होण्याआधी सभागृहातील त्या दोघींनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्या मान खाली घालून बसल्या होत्या व त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नव्हता. कार्यशाळा सुरु होण्याआधी आयोजकांनी त्यांचा परिचय करून दिला. त्या कर्नाटकातील कृषी शास्त्रज्ञ होत्या व अकरा तासांचा प्रवास करून स्व-खर्चाने तिथे आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या अत्यंत […]