पाणीबचतीचा हासुद्धा भन्नाट मार्ग
शाळेतल्या मुलांच्या पाण्याच्या बाटल्या घरी जाताना बहुतेकवेळा अर्ध्या भरलेल्या असतात. घरी गेल्यावर हे पाणी बेसीनमध्ये ओतून टाकलं जातं. ते अर्थातच वाया जातं. हजारो मुलांकडून असं हजारो लिटर पाणी वाया जातं… तेही दररोज. यावर पुण्यातल्या पिंपरीमधल्या एका शाळेने एक नामी शक्कल लढवली. “सिटी प्राईड स्कूल” ही ती शाळा. त्यांनी असा नियम केला की सगळ्या मुलांनी घरी जाताना […]