नवीन लेखन...

खरी शांतता

वाटत होता शांत मला तो,  बघुनी त्याच्या हालचालींना शिस्तबद्ध ते जीवन असूनी,  हास्य उमलते त्याच्या मना….१, अल्प बोलणें अल्प चालणें,  आहार तोहीं अल्पची घेणे प्रभू नाम ते मुखी असूनी,  चिंतन त्याचे सतत करणे….२, संघर्षाला टाळीत होता,  परिस्थितीशी जुळते घेवूनी वातावरण ते शांत ठेवण्या,  प्रयत्न चाले लक्ष देवूनी…३, अहंकार तो सुप्त असूनी,  राग न दाखवी चेहऱ्यावरी जगण्याचे […]

प्रथम शाहाणा कर

अपमान होईल तुझा शारदे, हे घे तू जाणूनी  । मूर्खावरती बरसत आहेस, जाणेना कुणी  ।। ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा, असे माझे ठायी  । भाषा साहित्य यांच्या छटा, दिसून येत नाही  ।। निर्धनासी धन मिळता,  जाई हर्षूनी  । हपापलेला स्वभाव येई, मग तो उफाळूनी  ।। माकडाचे हाती मिळे कोलित, विनाशास कारण  । गैरउपयोग होई शक्तीचा,  नसता सामान्य ज्ञान  […]

एक समाधानी योगदान

सकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता.   ” सर आज आम्ही चौघेही रुग्णालयामधून निवृत्त झालो. आमची नोकरी केवळ तुमच्यामुळेच होती. तुमचा आमच्या जीवनामधील सहभाग आम्ही केंव्हाही विसरु शकत नाही. ”  त्यानी ती भेट देत वाकून नमस्कार केला. मी भारावून गेलो. गहीवरलो. माझे डोळे पाणावले. सहजगत्या […]

‘बुध’ ग्रहाचे वेगळे दर्शन अर्थात बुध अधिक्रमण

बुधाचे निरीक्षण बुध ग्रह सूर्यास्तानंतर संध्याकाळी काही वेळ पश्चिम क्षितीजाजवळ दिसतो तर काही महिन्यात हाच बुध ग्रह पूर्व क्षितीजावर पहाटे सूर्योदयापूर्वी दिसतो. बुध हा सूर्यापासून पहिलाच ग्रह आहे. त्यामुळे त्याचे सूर्यापासूनचे अंतर कमी आहे. परिणामी बुध ग्रह सूर्याची पाठ कधीच सोडत नाही. विशिष्ट कालावधीत, सायंकाळी किंवा पहाटे आणि क्षितीजालगत बुध दर्शन होत असल्यामुळे बुध शोधणे म्हटल. […]

पोस्टमन

एका पोस्टमनने एका घराचे दार ठोठावले आणि हाक दिली,  “पत्र घ्या.” आतून एका लहान मुलीचा आवाज आला,  ‘येते येते.’ पण तीन -चार मिनीटे झाली तरी आतून कुणीही आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पोस्टमनने आवाज दिला, ‘अरे दादा,घरात कुणी असेल तर येऊन चिठ्ठी घ्या.’ पुन्हा एकदा त्याच लहान मुलीचा आवाज आला. ‘पोस्टमन काका, दरवाज्या खालून चिठ्ठी आत […]

अक्षय्य तृतीया महात्म्य

वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे; (काहींच्या मते […]

मंदिरप्रवेश-लढा आणि स्त्री-पुरुष-समानता

एप्रिल १७, २०१६ च्या लोकसत्ता-लोकरंग मधील मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय ?’ हा स्त्रियांच्या मंदिर-प्रवेशासंबंधीचा लेख वाचला ; व ८ मे, २०१६ च्या लोकरंगमधल्या. त्या लेखावरील प्रतिक्रियाही वाचल्या. आठलेकरांचा लेख उत्तम आहे. मात्र, आठलेकरांचा लेखातील कांहीं विचार वाचून सखेद आश्चर्य वाटलें. तेंच प्रतिक्रियांचेंही. या विषयावर अधिक-खोलवर विचार व्हायला हवा होता, असें मला वाटतें. […]

मालवण देवबागचं अनोखं  ‘त्सुनामी आयलंड’..!!

दोन दिवसांपूर्वी गांवाकडे आलोय सिंधुदुर्गात..सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत प्रचंड गरम..! घरात राहणं कठीण..! रात्री मात्र पांघरूणाशिवाय झोप यायची नाही येवढी छान थंड हवा..! काल घरातील सर्वांना घेऊन बहुचर्चित मालवण, तारकरली, देवबागला गेलो होतो..माझ्यासारख्या कोकणी माणसाला समुद्राचं कौतुक ते काय? परंतू देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावरील ‘त्सुनामी आयलंड’ बघण्याची उत्सुकता होती.. ‘त्सुनामी आयलंड’ हा एक निसर्गाचा चमत्कार आहे..या […]

आत्मा-ईश्वर – आई

आत्मा-ईश्वर, या शब्दांचा, अर्थ होई आई | त्या मायेचा, थांग न लागे, इतुकी गहराई ||१|| आईवाचुनी, नसे वेगळा, जगात परमेश्वर | स्वर्ग आणि सूर्य-चंद्रही, त्यापुढती नश्वर ||२|| सोशी वेदना, झेली यातना, नसे तया गणती | स्वतः जळुनी, प्रकाशणारी, ऐसी ती पणती ||३|| चिमणचोचिने भरवी बाळा, राही स्वतः उपाशी | होईल याची, तुलना कैसी, सांगा बरे कुणाशी? […]

आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते “चिंचोरे गुरुजी”

माझे वडील पूज्य पंडित विष्णू चिंचोरे हे त्यांच्या काळातील नामवंत शिक्षक होते ! पुणे येथील डेक्कन जिमखान्यावरील भांडारकर रोडवर असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे, जून १९३६ ते ३१ मे १९६१ ह्या कालावधीमध्ये ते मुख्याध्यापक होते. पुढे १ जून १९६१ ते ३० सप्टेंबर १९७५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक […]

1 161 162 163 164 165 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..